हिन्द न्यूज़, मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में ‘वंदे मातरम्’ इस राष्ट्रीय गीत के 150 वर्ष (सार्ध शताब्दी) पूर्ण होने के अवसर पर सामूहिक गायन।
इस दौरान मंत्री मंगलप्रभात लोढ़ा, मंत्री एड. आशिष शेलार समेत अन्य मान्यवर उपस्थित।
“वंदे मातरम् देशाला दिशा देणारे राष्ट्रीय प्रेरणेचे गीत”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालय, मुंबई येथे ‘वंदे मातरम्’ या गीताला 150 वर्ष (सार्ध शताब्दी) पूर्ण झाल्यानिमित्त सामूहिक गायन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेनानी-जोगळेकर यांच्यासोबत सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन ‘वंदे मातरम’चे गायन करत राष्ट्रभावना दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला, तर दिल्ली येथून व्हीसी मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही प्रेरणादायी संबोधन झाले.
या राष्ट्रीय गीताच्या मागे असणारी एकसंघ भारताची भावना, सुजलाम सुफलाम भारताची भावना, भारताला विश्वगुरू बनविण्याची भावना, सांस्कृतिक राष्ट्रवाद प्रतिपादित करणारी भावना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
आजच्याच दिवशी 150 वर्षांपूर्वी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘वंदे मातरम्’ ची रचना पूर्ण केली होती. त्या कालखंडात इंग्रजांनी त्यांचे राष्ट्रगीत गाण्याची सक्ती केलेली होती. यातून व्यथित झालेले बंकिमदा यांच्या लेखणीतून ‘वंदे मातरम्’ या आविष्काराची निर्मिती झाली. ‘आनंदमठ’ या आपल्या कादंबरीमध्ये बंकिमदा यांनी संकल्पना मांडली होती की, एक योगी इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध कशा प्रकारे बंड पुकारतो आणि समाजामध्ये प्रेरणा निर्माण करून लोकांना उभं करतो, अशा प्रकारच्या साहित्याची त्यांनी निर्मिती केली, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
ज्यावेळी रवींद्रनाथ ठाकूर यांनी काँग्रेसच्या अधिवेशनात ‘वंदे मातरम्’ चे गायन केले, तदनंतर त्याचे एका घोषवाक्यात रूपांतर झाले. बंगालच्या विभाजनाला विरोध म्हणून सुरु झालेल्या वंगभंग चळवळीच्या एका बैठकीत 30,000 लोकांनी पहिल्यांदा सामूहिकरीत्या ‘वंदे मातरम्’चे गायन केले. एक प्रकारे राष्ट्रगान म्हणून स्वातंत्र्याच्या लढ्यातील प्रत्येक विचारधारेला प्रेरणा व त्याकाळच्या खंडित झालेल्या समाजाला एकसंघ करण्याचे कार्य ‘वंदे मातरम्’ने केल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
आपल्या संबोधनात मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भारतीय संविधानाच्या निर्मितीनंतर राष्ट्रगीताच्या विषयावर दोन मतप्रवाह होते. एक गट राष्ट्रगीत म्हणून ‘जन गण मन’च्या बाजूला, तर दुसरा गट ‘वंदे मातरम्’ च्या बाजूने होता. त्यावेळी संविधानकारांनी हा निर्णय केला की हे दोन्ही आपले राष्ट्रगान असतील. जो सन्मान ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताला असेल तोच ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानाला असेल. ‘वंदे मातरम्’ मध्ये आपली मातृभूमी कशा प्रकारे सुजलाम सुफलाम होऊन आपले भरण-पोषण करते, दुष्टांचे निर्दालन करते, याचे वर्णन केलेले आहे. आजही 150 वर्षांनंतर ‘वंदे मातरम्’ देशाला दिशा देण्याचे कार्य करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये ‘विकास भी और विरासत भी’ ही भावना आहे. याच अनुषंगाने देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तसेच राज्यात आपल्या सरकारने ‘वंदे मातरम्’ च्या सन्मानार्थ अनेक बृहद कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. आपला वारसा ‘स्वर्णिम’ राहिलेला आहे, विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत, नालंदा-तक्षशिला सारख्या विद्यापीठांच्या माध्यमातून जगाला ज्ञान देणारा भारत आणि भगवान बुद्धांचे तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पसरवणारा भारत, पुन्हा एकदा तयार करण्याकरिता संकल्पबद्ध होण्याचा आजचा दिवस आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस याप्रसंगी म्हणाले.
